corona mumbai

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Published by : Lokshahi News

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. अशोक चव्हाण यांनी सकाळीच काँग्रेस बैठकीला हजेरी लावली होती. तसेच कॅबिनेट बैठकीला देखील अशोक चव्हाण हजर होते. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या वर्षी 25 मे 2020 रोजी प्रथम त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशोक चव्हाण यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. दरम्यान आज अशोक चव्हाण यांनी सकाळीच काँग्रेस बैठकीला हजेरी लावली होती. तसेच कॅबिनेट बैठकीला देखील अशोक चव्हाण हजर होते. 10 मिनिटं बसून ते निघाले होते.अशोक चव्हाण काल प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यात हजेरी लावली होती. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांना स्वत;ची चाचणी करावी लागेल.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha