संगमनेर तालुक्यात कोबी पिकाच्या बनावटा बियांनांचा शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. दिवाळीच्या तोंडावरतील शेतकऱ्यांनी कोबीची रोप विकत घेऊन लागवड केली होती, मात्र ही लागवड फेल ठरलेली आहे.
संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथील शेतकऱ्यांना कोणी दहा हजार कोणी सात हजार तर कोणी पाच हजार कोबीची रोप विकत घेतली चांगली मशागतही केली. लाखोंचा खर्च केल्यानंतर कोबीला सुपारी सारखे बारीक बारकीक गड्डे आले आहेत. यामुळे या गावातील शेतकरी मेटाकुटीला आल्याचे पाहायला मिळत आहे. संबंधीत कंपनीवर तात्काळ कारवाई करा आणि आम्हला नुकसान भरपाई द्या अशा मागणी शेतकरी वर्ग करत आहे.