Headline

‘त्या’ अर्जदारांना दिलासा; कागदपत्रे बँकेत सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ

Published by : Lokshahi News

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या कोंकण मंडळातर्फे ऑक्टोबर-२०२१ मध्ये ८९८४ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. या सोडतीतील २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील संकेत क्रमांक २८२ ते संकेत क्रमांक ३१९ मधील पात्रता/अपात्रता निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे विहित मुदतीत सादर करू न शकलेल्या यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे बँकेत सादर करण्यासाठी दि. १५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. 

 कोंकण मंडळातर्फे सोडत जाहीर झाल्यानंतर यशस्वी अर्जदारांना पात्रता/अपात्रता निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी तात्काळ प्रथम सूचना पत्रे पाठविण्यात आली. सोडतीतील २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ८१२ यशस्वी अर्जदारांपैकी ६२१ यशस्वी अर्जदारांनी बँकेत कागदपत्रे सादर केली आहेत. मात्र, १९१ यशस्वी अर्जदारांनी बँकेत आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा यशस्वी अर्जदारांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या संपूर्ण राज्यभरात मंडळाने निर्धारित केलेल्या शाखांमध्ये आवश्यक कागदपत्रे दि. १५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत सादर करावीत, असे आवाहन कोंकण मंडळातर्फे करण्यात आले आहे.        

  कोंकण मंडळाने सन‌ २०२१ मध्ये काढलेल्या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी चंदनसर (ता. वसई, जि. पालघर) येथे ८, वडवली (मोघरपाडा, ठाणे) येथे ७६ सदनिका, मौजे कावेसर आनंद नगर (ता. जि. ठाणे) येथे २३ सदनिका, गाव वालिव (ता. वसई, जि. पालघर) १६ सदनिका, कोपरी (ता वसई, जि. पालघर) येथे २ सदनिकांचा समावेश आहे. अल्प उत्पन्न गटासाठी कासारवडवली (ता. जि. ठाणे) येथे १६ सदनिका, मौजे वडवली (ता. जि. ठाणे) येथे ११६ सदनिका, मोघरपाडा (ठाणे पश्चिम) येथे १ सदनिका, मौजे पारसिक नगर (ता. जि. ठाणे) येथे ३५ सदनिका, मौजे डावले (ता. जि. ठाणे) येथे २८ सदनिका, मौजे कावेसर (ता. जि. ठाणे) येथे १४० सदनिका, बाळकुम- ठाणे येथे २१ सदनिका, भाईंदरपाडा-ठाणे येथे २४ सदनिका, अगासन-ठाणे येथे ४७ सदनिका, टिटवाळा (ता. कल्याण, जि. ठाणे)  येथे ६२ सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर ११ येथे ४० सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर ८ येथे ५१ सदनिका, मौजे वाळीव (ता. वसई, जि. पालघर) येथे ६८ सदनिका, कोपरी (ता. वसई, जि. पालघर) येथील २० सदनिकांचा समावेश आहे.  

Manisha Kayande Tweet | महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? मनिषा कायंदे यांचं ट्विट; नेमका अर्थ काय?

Latest Marathi News Updates live: ईव्हिम मशीनला विरोध करणारी याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

मंगळसूत्रात दोन वाट्या का असतात? महत्त्व जाणून घ्या

Gulkand Benefits : गुलाबाच्या पाकण्यांपासून तयार झालेला गुलकंद आरोग्यासाठी इतका फायदेशीर! कसा ते जाणून घ्या...

नरेश अरोरा यांचा Ajit Pawar यांच्या खांद्यावर हात, Amol Mitkari भडकले; थेट म्हणाले...