अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलर लियोनेल मेस्सीनं पुन्हा एकदा 'बॅलन डी'ओर अवॉर्डवर आपले नाव कोरलं आहे. लियोनेल मेस्सीने सातव्यांदा 'बॅलन डी'ओर अवॉर्ड पटकावला आहे. 34 वर्षांच्या मेस्सीनं पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तायानो रोनाल्डो आणि बायर्न म्यूनिखचा स्टार रॉबर्ट लेवानडॉस्कीला मागे टाकत हा अवॉर्ड आपल्या नावे केला आहे.
मेस्सीनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोनं सर्वाधिक वेळा 'बॅलन डी'ओर आपल्या नावे केलं आहे. रोनाल्डोनं 2008, 2013, 2014, 2016, 2017 मध्ये 'बॅलन डी'ओर आपल्या नावे केला आहे. तर यापूर्वी मेस्सीनं 2009, 2010, 2011, 2012, 2015 आणि 2019 मध्ये 'बॅलन डी'ओर अवॉर्ड जिंकला होता.
Ballon d'Or अवॉर्ड हा फ्रांसमधील फुटबॉल मासिक बॅलन डिओरच्या वतीनं देण्यात येतो. क्लब आणि राष्ट्रीय संघातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. याची सुरुवात 1956 साली झाली. हा पुरस्कार 1856 पासून दरवर्षी जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला दिला जात आहे.