Marathwada

विलीनीकरणाचा निर्णय रखडला, एस.टी कर्मचाऱ्यांची आत्महत्या

Published by : Team Lokshahi

गेले काही महिन्यापासून सुरू असलेलं एस.टी महामंडळाच्या कर्मचारीचे (ST Employees) विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले. पण एस.टी कर्मचाऱ्याची विलिनीकरणाची मागणी रखडली आहे. तीन महिण्यांपासून एस.टी कर्मचारी संपावर आहेत. एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य पसरले असून आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.

एस.टी ( ST bus) विलीनीकरणाबाबतचा निर्णय होत नसल्याने एस.टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता उस्मानाबाद (Osmanabad) शहरातील गणेश नगर (Ganesh Nagar) भागात राहात असणारे एस.टी वाहक हनुमंत चंद्रकात अकोसकर यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. हनुमंत चंद्रकात अकोसकर (Hanumant Chandrakat Akoskar) या एस.टी कर्मचाऱ्यांने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असल्याने एस.टी कर्मचारांमध्ये खळबळ माजली आहे. एस.टी विलीनीकरणाच्या संपामध्ये एस.टी वाहक हनुमंत चंद्रकांत अकोसकर सहभागी होते. एस.टी विलीनीकरणाबाबत निर्णय होत नसल्याने त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी