India

पवारांना युपीए अध्यक्ष करण्याचा मेहबूब शेख यांचा प्रस्ताव

Published by : Vikrant Shinde

केंद्रात भाजपला (BJP in Central Goverment) हरवायचं असेल तर, सर्व प्रादेशिक पक्षांनी (Regional Parties) एकत्र यायला हवं असं मत अनेक राजकीय विश्लेशकांनी तसेच, अनेक वरीष्ठ राजकारणी मंडळींनीही सातत्याने व्यक्त केलं आहे. मागील वर्षभरात देशपातळीवरील भाजपविरोधी नेत्यांमध्ये झालेल्या बैठकींमुळे त्यासंदर्भातील हालचाली सुरु झाल्या असल्याचाही अंदाज वर्तवला जातोय.

दरम्यान, आज दिल्लीत (Delhi) पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (Nationalist Youth Congress) राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मेहबूब शेख यांनी शरद पवारांकडे (Sharad Pawar) युपीए (United Progressive Alliance) अध्यक्षपद सोपवावं असा प्रस्ताव मांडला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खुद्द शरद पवारदेखील उपस्थित होते.

काय म्हणाले शेख?
'भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र यायला हवं. शरद पवारांच्या नेतृत्त्वात भाजपला पराभूत करणे शक्य होईल.' तर, 'सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येवून शरद पवारांचे नेतृत्व स्वीकारावे' असंही ते म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...