Mumbai

दोन वर्षानंतर राज्यात मास्कमुक्ती

Published by : Jitendra Zavar

गेले दोन वर्षांपासून कोरोना महासाथीने थैमान घालते आहे. त्यात आता दिलासा मिळत असल्याने राज्यातील निर्बंध शिथील करण्यात आले. पण चेहऱ्यावरील मास्क काही हटला नव्हता. (Mask mandatory). आता राज्यात गुढीपाडव्याआधी मास्कमुक्ती झाली. राज्यात आता मास्क वापरणं बंधनकारक नाही तर ऐच्छिक असणार आहे. (Maharashtra new corona guidelines).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरु आहे. मार्च 2020 पासून राज्यात कोरोना निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर हळू हळू निर्बंधातून सूट देण्यात आले होते. आता राज्यात सर्व प्रकराचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. १ एप्रिलपासून आपत्कालीन कायदा मागे घेण्यात आला आहे. यामुळे मास्कवरील सक्तीही हटवण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांना माध्यमांना दिले. त्यापुर्वी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टि्वट करत राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. एप्रिल २०२० पासून मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले होते. आता दोन वर्षानंतर मास्कसंदर्भातील हा निर्णय मागे घेण्यात आला.

https://lokshahi.live/all-restrictions-in-maharashtra-were-lifted-decision-taken-cabinet-meeting/

महाराष्ट्रात उद्यापासून काय काय बदलणार?
– 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात करोनाचे सर्व निर्बंध हटतील
– मार्च 2020 ते 31 मार्च 2022 जवळपास दोन वर्षे लागू असलेले कोरोनाचे निर्बंध संपुष्टात येतील
– गुढीपाडवा शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान उत्साह साजरा करता येणार
– केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग कायम असेल
– मात्र महाराष्ट्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती नसेल, मास्क लावणे ऐच्छिक असेल
– हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा नाही
– लग्न किंवा कौटुंबीक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा नाही.
– बस, लोकल आणि रेल्वेने प्रवास करताना लशीचं प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही.
– सार्वजनिक ठिकाणं, मॉल, बगिचे याठिकाणी मास्क वापरणे किंवा लशीचं प्रमाणपत्र धाखवण्याची गरज भासणार नाही.
– महारष्ट्रभरात सर्वधर्मीयांचे सर्व उत्सव निर्बंधमुक्त असतील, यात्रा-जत्रा धुमधडाक्यात होणार
– निर्बंधामुळे उद्योग आणि व्यवसायांवर आलेली बंधनं हटली आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा