India

Mamta banerjee | ममतांवर कोणीच हल्ला केला नाही!

Published by : Lokshahi News

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. नंदीग्रामच्या बिरुलीयामध्ये प्रचारादरम्यान आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेत जखमी झालेल्या ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात आणण्यात आलं. त्यांच्यावर आता कोलकात्यातील एसएसकेएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ममता यांना दुखापत झाली हे खरे असले तरी देखील ममता यांच्या कारजवळ उभ्या असलेल्या प्रत्यक्षदर्शी कार्यकर्त्याने असे काही घडलेच नसल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ममता यांच्या पक्षाने तिथे 4-5 समाजकंटक होते. त्यांनीच ममता गाडीत बसत असताना दरवाजा ढकलल्याचा आरोप केला आहे. मात्र, चित्तरंजन दास नावाच्या तरुणाने तेथील घडलेला प्रकार सांगितला आहे.

दासने सांगितले की, मी घटनास्थळी होतो. मुख्यमंत्री त्यांच्या कारमध्ये बसलेल्या होत्या. पण दरवाजा उघडा होता. हा दरवाजा एका पोस्टरला आपटला आणि बंद झाला. कोणीही त्यांच्या कारचा दरवाजा ढकललेला नाही. दरवाजाकडे कोणीही उभे नव्हते.

तर आणखी एक प्रत्यक्षदर्शी असलेली विद्यार्थीनी सुमन हिने सांगितले की, ममता यांना पाहण्यासाठी लोक जमा झाले होते. सर्वजण त्यांना घेरून उभे होते. त्याचवेळी त्यांच्या मानेला दुखापत झाली. कोणी धक्का दिला नाही, त्यांची गाडी हळू हळू पुढे जात होती.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result