पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर प्रचार बंदी घालण्यात आली आहे. २४ तासांची प्रचार बंदी घालण्यात आली आहे. प्रचारादरम्यान हिंदू-मुस्लिम वक्तव्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहित निवडणूक आयोगाने दिली आहे.
सोमवार १२ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून मंगळवारी १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपर्यंत ही बंदी लागू असणार आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या प्रचारमोहिमेला फटका बसला असून मंगळवारी ममतादीदींच्या सर्व प्रचारसभा रद्द करण्याची वेळ पक्षावर आली आहे.
या पार्श्वभूमीवर ममतादीदींवरची ही प्रचारबंदी भाजपाच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे. २४ तास ममता बॅनर्जी प्रचारापासून दूर आणि पुढच्या प्रचारांमध्ये या मुद्द्याचं भांडवल करण्याची संधी असा दुहेरी फायदा भाजपाचा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.