केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यातील संघर्ष कमी होताना दिसत नाही. मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांच्या बदलीवरून वाद सुरूच आहे. त्यांनी अलपन बंडोपाध्याय यांना आपला मुख्य सल्लागार बनविण्याची घोषणा केली आहे. मंगळवारपासून अलपन बंडोपाध्याय हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम सुरू करतील. त्याचबरोबर मुख्य सचिव पदाची जबाबदारी हरिकृष्ण द्विवेदी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले की, 31 मे पासून अलपन बंडोपाध्याय सेवानिवृत्त होत असले तरी त्यांना मी असेच सोडणार नाही. सेवानिवृत्त झाले असले तरी ते दिल्लीला जाणार नाहीत, ते आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार असतील. तसेच, त्या पुढे म्हणाल्या की, अलपन बंडोपाध्याय मंगळवार 1 जूनपासून मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून कार्यभार स्वीकारतील.