Zomato कंपनीने व्हेज म्हणजेच शाकाहारी लोकांसाठी मंगळवारी एक घोषणा केली आहे. व्हेज लोकांसाठी चांगली सेवा देता यावी म्हणून कंपनीने 'प्युअर व्हेज मोड' आणि 'प्युअर व्हेज फ्लीट' सोबत प्युअर व्हेज मोड असे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. झोमॅटोचे मुख्य संपादक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
दीपिंदर गोयल ट्विटरवर पोस्ट करत म्हणाले की, भारतात सर्वात जास्त लोकसंख्या ही शाकाहारी अन्न खाणाऱ्या लोकांची आहे. झोमॅटोवरील ग्राहकांना प्युअर व्हेज जेवण खाता यावे म्हणून या नवीन पद्धतीचा अवलंब केला. यामुळे लोकांकडून आलेल्या फिडबॅकनंतर आम्ही नवीन सर्व्हीस सुरु केली आहे. आता झोमॅटो शाकाहारी लोकांसाठी लाल रंगाचे डब्बे वापरण्याऐवजी हिरव्या रंगाचे डब्बे वापरणार आहे. तसेच डिलेव्हरी बॉयसुद्धा हिरव्या रंगाची शर्ट परिधान करतील. हे जेवण शुद्ध शाकाहारी हॉटेलमधून येणार आहे. तसेच या निर्णयास विरोध झाला तर तो आम्ही परत घेऊ.
झोमॅटो प्युअर व्हेज फ्लिट यावर दीपिंदर गोयल म्हणाले की, झोमॅटो प्युअर व्हेज क्लिटमध्ये साधारणपणे फक्त व्हेजच्या ऑर्डर डिलिव्हरी करणारे ग्राहक असणार आहेत. ते मांसाहारी हॉटेलमध्ये जाणार नाहीत आणि मांसाहारी जेवणाची डिलिव्हरी करणार नाहीत. ही घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. मोठ्या संख्येने युजर झोमॅटोच्या निर्णयास विरोध करु लागले. त्यामुळे काही तासानंतर हे निर्णय मागे घेण्यात येत असल्याचे दीपिंदर गोयल यांनी जाहीर केले.