महाराष्ट्र

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळुरु महामार्ग रोखला

Published by : Lokshahi News

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे. यावेळी नारायण राणे यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. महामार्ग रोखताना पोलीस आणि आंदोलक आपसात भिडल्याचंही दिसलं. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड धक्काबुकी देखील झाली.

नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी युवा सेनेने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या. पोलिसांचा दबाव झुगारून शिवसैनिकांनी महामार्गावर रास्ता रोको केला. यानंतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु