katal Shilp Team Lokshahi
महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये अंबाजोगाईच्या तरुणांचा डंका

१४ ऑक्टोबर रोजी “कातळशिल्प” शॉर्टफिल्म दाखवणार

Published by : Sagar Pradhan

१४ ऑक्टोबर रोजी इटली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोकणातील कातळशिल्पांवर आधारीत तयार करण्यात आलेली “कातळशिल्प” ही शॉर्टफिल्म दाखवण्यात येणार असून या फिल्मची निर्मिती निसर्ग रात्री संस्था आणिअंबाजोगाई येथील दृश्यम कम्युनिकेशन यांनी केली आहे तर या फिल्मचे संगीत दिग्दर्शक अंबाजोगाई येथील ओंकार रापतवार याने केले आहे. अंबाजोगाई येथील या दोन तरुण दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या कातळशिल्प च्या दिग्दर्शनाचा डंका आता जागतिक पातळीवर पोहोचणार आहे.

कोकणातील कातळशिल्पांवरील शॉर्टफिल्म आता इटलीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकेल. पुरातत्त्व शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा फेस्टिव्हल आहे. निसर्गयात्री संस्था आणि दृश्यम कम्युनिकेशन्सने याची निर्मिती केली. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये कातळशिल्पांची नोंद होण्याकरिता या फेस्टिव्हलचा उपयोग होऊ शकतो. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये इटली येथे ‘फेस्टिवल डे’ला (१६ ऑक्टोबर रोजी) कम्युनिक्याझिओन ई-डेल सिनेमा ओर्किओलॉजिको हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्म फेस्टिवल आयोजित केला जातो. पुरातत्त्व शास्त्राच्या दृष्टीने हा फेस्टिवल महत्त्वाचा आहे. त्यामुळेच जगभरातील इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र विषयातील तज्ज्ञ मंडळींची उपस्थिती याला लाभेल. यातून कातळशिल्पांच्या संवर्धन, संशोधन, अभ्यासाला गती मिळणार आहे.

कोकणातील “कातळशिल्प” या शॉर्टफिल्म ला राहुल नरवणे यांचे दिग्दर्शन तर ओंकार रापतवार संगीत दिग्दर्शक!

या शॉर्टफिल्मची निर्मिती रत्नागिरीच्या निसर्गयात्री संस्था आणि पुण्यातील दृश्यम कम्युनिकेशन्स यांनी केली आहे. या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन राहुल नरवणे यांनी केले आहे. लेखन आणि निवेदन सायली खेडेकर हिने केले आहे. सिनेमॅटोग्राफर सतीश शेंगाळे, दत्ता मानकर, संपादन मदन काळे, सत्यम अवधूतवार, मयुरेश कायंदे, संगिताची जबाबदारी ओंकार रापतवार यांनी निभावली आहे. ही शॉर्टफिल्म कोकणातीलकातळशिल्प शोध संरक्षण आणि संवर्धन यावर आधारित आहे. रत्नागिरीतील सुधीर रिसबूड, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई आणि राजापूरमधील धनंजय मराठे यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी कोकणातील कातळशिल्पांच्याशोध, संशोधनाला सुरुवात केली. त्यात त्यांना यश मिळाले. अथक परिश्रम, अभ्यास, रेखाचित्र, संदर्भ, उपलब्ध माहितीद्वारे त्यांनी ७१ गावांत १७०० पेक्षा अधिक कातळशिल्प रचना १५०० हून अधिक कातळशिल्पे शोधली आहेत. शासन, जिल्हाधिकारी, पुरातत्व विभाग, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. यातूनच पहिला कातळशिल्प महोत्सव थिबा राजवाडा येथे भरवण्यात आला होता. या वेळी कातळशिल्पांची डॉक्युमेंटरी फिल्मही बनवण्यात आली होती.

काय असते कातळशिल्प?

एका प्रकारच्या या शिल्पांसाठी कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतलेली दिसते. त्या चौकटीत ही शिल्पे कोरलेली असतात. त्यांना उठाव काहीसा कमी असतो. अशी शिल्पे कोकणात तुलनेने अत्यल्प आहेत.

दुसऱ्या प्रकारात सरळ रेषेच्या आधारे द्विमितीय चित्रे दिसतात. कोकणातील कातळशिल्पांमध्ये यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, गोपद्मे व मासा,कासव असे विविध प्राणी, पक्षी यांच्या आकृती, व सांकेतिक खुणा दिसतात. काही ठिकाणी भौमितिक रचनाही आढळतात.देवाचे गोठणे गावातील शिल्पात सड्यावरील दगडात विशिष्ट जागी चुंबकीय बदल दिसून येणारे शिल्प आहे.

  • प्राणी- चिह्न स्वरूपात प्राण्यांची शिल्पे कोरलेली दिसतात. शिल्परचनेतील प्राणी आणि मूळ प्राणी यांच्या आकारात साम्य आढळते.

  • पक्षी- शिल्परचनेत पक्षी असण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मूळ पक्ष्यांच्या आकारात आणि शिल्पातील पक्ष्यांच्या आकारात फरक दिसून येतो.

  • जलचर आणि उभयचर प्राणी- प्रतिमा व मूळ आकार यांच्यात या शिल्पाकृतीत सारखेपणा दिसून येतो. समुद्री कासव, मगर, विविध प्रकारचे मासे यांची शिल्पे कोरलेली दिसून येतात.

  • मनुष्याकृती- या रचना मानवी शरीराच्या आकाराशी जुळणाऱ्या नसल्या तरी हे चित्रण सादृश्य (?) आहे असे दिसून येते. या प्रतिमा स्त्रीच्या आहेत की पुरुषाच्या आहेत हे कळण्याच्या दृष्टीने त्यावर कोणत्याही खुणा आढळत नाहीत.

  • गोपद्म/भौमितिक रचना- यांच्या आकारात विविधता असून या चिह्नांकित रेखाकृती या स्वरूपात कोरलेल्या दिसतात.

  • मातृदेवता- गुडघ्यापासून खाली मानवी पायाच्या रचनेतून कोरलेली अशा प्रकारची शिल्पे काही चित्रे आहेत. या रचना पाहता त्या मातृदेवता असाव्यात का यावर अभ्यासक संशोधन करीत आहेत.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result