अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामण यांनी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
यावर आता यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, महाराष्ट्राला काहीही मिळालेलं दिसत नाही आहे. हे पूर्ण पॅकेज आहे. हे जे आताचं बजेट ज्याची घोषणा झालेली आहे. एकंदरीत नितिश कुमारजी आणि चंद्रबाबू नायडूजी यांना स्पेशल ट्रिटमेंट दिल्यासारखी वाटते.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राकडे, विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. इथं शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. यांच्यासाठी काही दिसत नाही आहे. हे जे बजेट आहे ते फक्त महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे. असं दिसते आहे. महाराष्ट्राला पूर्णपणे रिकामं ठेवलेलं आहे. असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.