महाराष्ट्र

...म्हणून हा निर्णय घेतला, बंडखोर आमदार यामिनी जाधव यांचे आरोप

Published by : Shweta Chavan-Zagade

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे 37 आमदारांनी सध्या बंड केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी काल आमदार संजय शिरसाट यांचा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला होता. आज एकनाथ शिंदे यांनी भायखळा विधानसभा मतदरासंघाच्या आमदार यामिनी जाधव यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी भावपूर्ण प्रसंग सांगितला आहे. आम्ही सर्व शिवसेनेतच पण हा निर्णय घेण्याची वेळ का आली हे सर्वांनी समजून घ्यावं, असं एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे. संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील नाही याचे मनात शल्य असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. तर, यामिनी जाधव यांनी आम्ही आजही शिवसैनिक असून शिवसैनिक म्हणून जग सोडू, असं म्हटलं आहे.

यामिनी जाधव काय म्हणाल्या?

गेल्या काही दिवसांतील घडामोडी ज्या घडत आहेत त्यामुळं महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा उद्रेक आम्ही नक्कीच समजू शकतो. आम्हीच अजूनही शिवसैनिक आहोत, पुढील काळातही राहणार आहोत, हे जगही शिवसैनिक म्हणून सोडू, असं यामिनी जाधव म्हणाल्या. यशवंत जाधव हे ४३ वर्ष शिवसेनेत आहेत, वयाच्या १७ वर्षांपासून शिवसेनेत आहोत. अनेक अडचणी आल्या आर्थिक अडचणी आल्या निवडणुका हराव्या लागल्या, असं आमदार यामिनी जाधव म्हणाल्या.

आयुष्यात कॅन्सर नावाचं वादळ

गेले काही महिने ऑक्टोबरपासून कॅन्सर नावाचं वादळ आलं. आम्हाला हे समजलं त्यावेळी संपूर्ण कुटुंब तुटलं. कॅन्सर झाल्याची माहिती यशवंत जाधव यांनी पक्षनेतृत्वाला दिली होती. एक महिला आमदार म्हणून माझ्या घरी काही नेते येतील. आपल्या महिला आमदार कॅन्सरनं त्रस्त आहेत हिच गोष्टी मोठी हालवणारी होती. कुटुंब, भायखळा मतदारसंघातील शिवसैनिकांनी खूप साथ दिली. माझी विचारपूस केली जाईल, साथ दिली जाईल, अशी अपेक्षा होती. किशोरीताई पेडणेकर माझ्या घरी आल्या आणि मला सूचना केल्या. पण, ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांनी कुणीही माझी विचारपूस केली नाही, अशी खंत यामिनी जाधव यांनी व्यक्त केली.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result