महाराष्ट्र

बेळगावात शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेचा हल्ला, जिल्हाप्रमुखांची गाडीही रोखली

Published by : Lokshahi News

बेळगाव शहरातील रामलिंग खिंड येथील शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यर्त्यांनी हल्ला चढविला आहे. पोलीस संरक्षण असतानाही हा प्रकार घडल्यामुळे सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. रुग्णवाहिकेचा बोर्ड तोडण्यात आला आहे. यावेळी गाडीला काळे फासण्याचा प्रयत्न होत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडविले आणि पळवून लावले.

महापालिकेसमोर अनधिकृतरित्या लाल पिवळा ध्वज लावण्यात आल्यापासून कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध कारणांनी शहरात दहशत माजविण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी दुपारी सम्राट अशोक चौकाजवळ शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला काळे फासण्याचा प्रयत्न केला. यावेळी रोखण्यास गेलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर तसेच शिवसैनिक प्रविण तेजम यांनाही रोखण्याचा प्रयत्न झाला. यावेळी जोरदार वादावादीही झाली. त्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात ठाकरे, पवारांसह काँग्रेसचाही नायनाट झालेला दिसेल : रामदास कदम

'जरांगेंची निवडणूक लढवण्याची पात्रता नाही' ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Gift ideas for Diwali : दिवाळीत आपल्या प्रियजनांना द्या 'हे' गिफ्ट्स

Diwali 2024: दिवाळीमध्ये उटणे लावण्यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

'आभाळमाया', 'वादळवाट' च्या शीर्षकगीतांचा जादूगार हरपला, गीतकार आणि पटकथाकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन