महाराष्ट्र

अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचे आमरण उपोषण, अखेर पोलिसांनी रुग्णालयात हलवलं

Published by : Lokshahi News

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विधानसभा मतदारसंघातील गरीब महिलेवर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांने सदर महिलेच्या घरचे ग्राहकांचे सिलेंडर जप्त करून खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करत चांदुर बाजार तालुक्यातील वणी बेलखेडा येथील महिला दोन दिवसापासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसली होती. महिलेने अन्न्यत्याग आंदोलन केल्याने तिची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे तिला पोलिसांनी उपोषण मंडपातून जबरदस्तीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.

ज्योत्सना गावनेर ही महिला गरीब महिला घरोघरी ग्राहकांना सिलेंडर देण्याचं काम करते. यातून तिचा उदरनिर्वाह चालतो. मात्र गावातील प्रहार संघटनेचा कार्यकर्ता मंगेश देशमुख यांनी महिलेची खोटी तक्रार करून तिच्यावर पोलीस कारवाई करून तिच्यावर गुन्हे दाखल केले असा आरोप महिलेचा आहे.

त्यामुळे न्यायासाठी १४ ऑगस्टपासून ती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसली होती. मात्र उपोषणाचा तिसरा दिवस असूनही उपोषणाची दखल घेतली नाही. परिणामी उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती बिघडली आहे. तिने अन्नत्याग केल्याने तिला पोलिसांनी उचलून रुग्णालयात नेले.

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे

Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना

वडीगोद्रीतून अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता केला खुला

Akola : अकोला कृषी विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश