महाराष्ट्र

Winter Session : हिवाळी अधिवेशन लांबणार की गुंडाळणार?, आज होणार निर्णय

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील आज दुसरा दिवस आहे.

Published by : Siddhi Naringrekar

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील आज दुसरा दिवस आहे. आज विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातील. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडणार आहे.

विधानसभा कामकाज सल्लागार समितीची दुपारी ३ वाजता ही बैठक होणार आहे तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची दुपारी ३.३० वाजता बैठक होणार आहे. विरोधकांकडून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र सरकार २० डिसेंबरपर्यंत अधिवेशन घेण्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे.

तसेच राज्यातील धनगर आरक्षणाबाबत आज विशेष चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभेत नियम ९४ अन्वये चर्चा उपस्थित केली जाणार आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या मराठा निवेदनाकडे लक्ष असताना धनगर आरक्षणाच्या भूमिकेकडे लक्ष आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी