मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंना महाड कोर्टात हजर करण्यात आले असून न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान नारायण राणेंना जामीन मिळणार का ? य़ाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
नारायण राणे यांना महाड कोर्टात हजर करण्यात आले आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू झाली आहे.अॅड. अधिक शिरोडकर राणेंची बाजू मांडत आहे. तर अॅड. प्रकाश जोशी सरकारी वकील आहेत. पोलीसांकडून सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.