महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांचा फडणवीसांना टोला, म्हणाले…

Published by : Vikrant Shinde

सध्या राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असल्याचं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पेन ड्राईव्ह बाँब (Pen Drive Bomb) फोडल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांना प्रत्यूत्तर दिलं आणि त्यानंतर फडणवीसांनी आणखी एक पेन ड्राईव्ह अध्यक्षांकडे सुपूर्त केला.

दरम्यान, आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Aambedkar) यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना "फडवणीसांनी 'नुरा कुस्ती' खेळू नये", अशा शब्दात टीका केली.

नुरा कुस्ती म्हणजे नेमकं काय?
नवाबांच्या काळात कोंबड्यांची कुस्ती अतिशय प्रसिद्ध होती. त्या काळात ह्या कुस्तीवर लोक मोठ्या प्रमाणात पैज (Betting) लावायचे. तसेच जो व्यक्ती या कुस्तीचं आयोजन करायचं त्याला कमिशनही (Comission) मिळायचं. 'नुरा' नावाचा व्यक्तीदेखील कोंबडा कुस्तीचं आयोजन करायचा. परंतु, देशभरातील आयोजित केली जाणारी कोंबडा कुस्ती आणि नुराची कोंबडा कुस्ती यात मोठा फरक होता. नुरानं त्याच्या कोंबड्यांना खास प्रशिक्षण दिलं होतं. जे त्यानं इशारा करताच कुस्ती हारायचे. ज्यामुळं नुराला अधिक नफा मिळत असे. मात्र, हळूहळू नुराच्या फिक्सिंगची जाणीव सर्वांना होत गेली आणि कोंबड्यांच्या या कुस्तीला नुरा कुस्ती असं नाव देण्यात आलं.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result