मेडिकल इंजिनिअरिंग म्हणजेच करिअर आहे, असे नाही. त्याशिवाय चार हजारपेक्षा जास्त अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यासाठी पालकांनी आपल्या मुलाची क्षमता, त्याची आवड ओळखून अभ्यासक्रमाची निवड केली पाहिजे. अभ्यासक्रम निवडण्याचे संपुर्ण स्वातंत्र पालकांनी मुलांना द्यावे.
१०० पेक्षा जास्त विषयात बी.एस्सी.
यंदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शंभरपेक्षा अधिक स्पेशलाइज्ड विषयात बी.एस्सी. करण्याची संधी आहे. या विषयांत मायक्रोबायलॉजी, बायोटेक्नाँलॉजी, फॅरेन्सिक सायन्स, फूड टेक्नाँलऑजी, स्टॅटिस्टिक, नर्सिंग, मेकॉट्रॉनिक्स, बायोफिजिक्स, बायोकेमिस्ट्री, एन्व्हॉयर्नमेंट, फिशरी, संगणक व माहिती तंत्रज्ञानशास्त्राचा समावेश आहे.
कला शाखेत अनेक संधी
बी.ए. पदवी आता मराठीसह इंग्रजी माध्यमातून करता येते. संगीत, योगा, नाट्य, इंग्रजी-हिंदी-मराठी साहित्य, संस्कृत, उर्दू. राज्यशास्र, समाजशास्त्र, इतिहास आदी विषय घेतले तर स्पर्घा परीक्षेची तयारीही करता येते.
वाणिज्य मुबलक मार्केट
बी.कॉम.मध्ये बँकिंग, इन्शुरन्स, अकाउंटन्सी, आँडिटिंगसह स्पेशलाइज्ड विषयात पदवीधरांना नोकरीची संधी वाढते.
बी.एस्सी. इन डेटा अँनालिसिस
आयआययटी मद्रासला आहे. शंभर टक्के ऑनलाइन कोर्स आहे. कोणत्याही शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
बीएएलएलबी
बीए आणि कायद्याचं शिक्षण एकत्रित घ्यायचं असल्यास बीएएलएलबी हा एक चांगला पर्याय आहे. बारावी कला शाखेचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असल्यास एमएचसीईटी, क्लॅट, लॉसीईटी द्यावी लागते. मात्र, विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत 50 टक्के गुण मिळालेले असणं आवश्यक आहे.
इतर अभ्यासक्रम
बॅचलर ऑफ हॉस्पिटीलीटी मॅनेजमेंट, बॅचरल फिजीकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, हॉटेल मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग
B.Sc. समुद्री विज्ञान
बी.एससी. समुद्री विज्ञान कोर्स तुम्हाला मर्चंट नेव्ही सेक्टरमध्ये फायदेशीर करिअर तयार करण्यात मदत करेल. शैक्षणिक कार्यक्रम 3 वर्षांचा आहे. ही आहे मर्चंट नेव्हीची प्रवेश परीक्षा - IMU CET.पीसीएम विषयांसह बारावी विज्ञान उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हा अभ्यासक्रम करण्यास पात्र आहेत. नामांकित महाविद्यालयात प्रवेश सुरक्षित करण्यासाठी, एखाद्याने संबंधित प्रवेश परीक्षा (राज्यनिहाय किंवा संस्थानिहाय) क्रॅक करणे आवश्यक आहे.
B.Sc. शेती
बी.एस्सी. कृषी अभ्यासक्रम 3 वर्षांचा आहे. हा कार्यक्रम कृषी विज्ञानावर केंद्रित आहे आणि कुशल कृषी व्यावसायिकांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. अभ्यासक्रमात विज्ञान, जीवशास्त्र, तंत्रज्ञान, रसायनशास्त्र आणि कृषी विज्ञान या घटकांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाचे पात्रता निकष एका संस्थेनुसार भिन्न असू शकतात. विज्ञान प्रवाह शिक्षण अनिवार्य आहे तरी! नामांकित संस्थांमध्ये प्रवेश सुरक्षित करण्यासाठी, उमेदवाराने संबंधित प्रवेश परीक्षा (जसे की राज्यवार आणि संस्थानिहाय प्रवेश परीक्षा) क्रॅक करणे आवश्यक आहे.
B.Sc. वनीकरण
B.Sc. वनीकरण कार्यक्रम प्रामुख्याने वन विज्ञानाशी संबंधित आहे, पर्यावरण विज्ञान, जीवशास्त्र, कृषी आणि तंत्रज्ञान. शैक्षणिक कार्यक्रम 3 वर्षांचा आहे. वनीकरण पदवीधरांना त्यांच्यासमोर विविध प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाचे पात्रता निकष एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत बदलू शकतात. विज्ञान प्रवाह शिक्षण अनिवार्य आहे!
प्रवेश मिळण्याची खात्री
३५ ते ५९ टक्के गुण घेणाऱ्यांना बी.ए. ला प्रवेश मिळण्याची खात्री आहे. पण पसंतीचे कॉलेज मिळेलच याची खात्री नाही.
अनुदानित कॉलेजला पसंती
५१ पेक्षा अधिक विषयात बी.ए. आहे. या कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्राधान्यक्रम ठरवता येऊ शकतो.
विषय निवडण्याचे स्वातंत्र्य
या स्लॅबमधील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना हवे असलेले शहर, कॉलेज आणि विषय निवडण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य मिळू शकेल.