महाराष्ट्र

विरारमध्ये अंमली पदार्थ जप्त, गांजा विक्रीचा पर्दाफाश

Published by : Lokshahi News

संदीप गायकवाड | विरार पूर्व कारगिल नगर परिसरातील गणेश चौकात दोन अज्ञात व्यक्ती अंमली पदार्थ विकण्यासाठी येत असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत पोलिसांना मिळाली होती.

त्याअनुषंगाने विरार पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना पकडण्यास यश मिळवलं आहे. अन्वर इस्माईल शाह(26), सोनी(उर्फ)भरत चंदू सोलंकी(40)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत. आरोपीकडून तब्बल 3 लाख 82 हजार 500 रुपये किंमतीचा 25 किलो वजनाचा गांजा विरार पोलिसांनी हस्तगत केला आहे.

आरोपींना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून.हे अंमली पदार्थ कुठून आलं आहे,याची विक्री कशी होणार होती. याचा सखोल तपास विरार पोलीस करत आहेत. सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उप निरीक्षक अभिजित टेलर,PSI संदेश राणे,पो.हवा.सचिन लोखंडे,विजय दुबळा,हर्षद चव्हाण,भूषण वाघमारे ,संदीप शेरमाळे,पो.शी.इंद्रनील पाटील,विशाल लोहार, रवी वानखेडे,सुनील पाटील,पवन पवार,सागर घुगरकर यांनी संयुक्त विद्यमाने केली आहे.

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news