पुणे : रत्नागिरीत पावसाने हाहाकार केला आहे. यामुळे घरांमध्ये आणि बाजारपेठेत पाणी घुसले आहे. अशातच, हवामान विभागाने चिंता वाढवणार अंदाज वर्तविला आहे. हवामान विभागाकडून कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील ४८ तासात राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र मध्ये पुढील २ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून पुण्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण कोकणात पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट तर कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी जारी केला आहे. दरम्यान, राज्यात ३ तारखेनंतर मात्र पावसाचा जोर कमी होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
दरम्यान, केरळसह गोवा राज्याच्या किनारी भागात वादळसदृश परिस्थिती निर्माण झालीये. कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळलेला नसला तरीही खोल समुद्रात धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रत्नागिरीतील सर्वात मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरकरवाडा येथील नौका बंदरातच उभ्या करून ठेवण्यात आल्यात. नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.