महाराष्ट्र

महाबळेश्वरच्या नागरी वस्तीत शिरले पाणी…जनजीवन विस्कळीत

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप | महाबळेश्वर येथील क्षेत्र महाबळेश्वर परिसरामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी जलभरणी झाली आहे. या जलभरणीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महाबळेश्वर तालुक्यात सगळ्यात जास्त पाऊस हा क्षेत्र महाबळेश्वर परिसरात पडला आहे. गेल्या 24 तासात 480 मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक पाऊस हा गेल्या 24 तासात महाबळेश्वर तालुक्यातील क्षेत्र महाबळेश्वर परिसरात पडला असून सगळ्यात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरी वस्तीत पाणी शिरले असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी