आषाढी पालखी सोहळा विश्वस्त आणि वारकरी संघटना यांच्या मागण्या पुण्याच्या विभागीय आयुक्तनांनी अमान्य केल्या आहेत. शासनाच्या नियमानुसारच आषाढी वारी होणार असल्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत.
यंदाचा पालखी सोहळा एसटीतून पंढरीला जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाला वारकरी संप्रदयातून विरोध वाढू लागला आहे. अखिल भारतीय वारकरी भाविक संघटनेने बैठक घेऊन शासनाच्या निर्णयाला विरोध केला. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी 30 जून ला आझाद मैदानावर भजन आंदोलन करण्याचे ठरवलंय.
याही पुढे जाऊन शासनाने पायी वारीला परवानगी न दिल्यास 3 जुलैला आळंदीहून दहा दहा वारकऱ्यांच्या ग्रुप करून पंढरीची आषाढी पायी वारी करणार असल्याचे अखिल भारतीय वारकरी भाविक संघटनेचे ह भ प सुधाकर महाराज इंगळे यांनी सांगितलंय.