भुपेश बारंगे | वर्धा : विरोधी पक्षनेते अजित पवार कालपासून विदर्भ (Vidarbha) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यांत त्यांनी नक्षलग्रस्त भाग गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यास विशेष भेट दिली आहे. या भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत प्रशासकीय अधिकाऱ्याच्या आढावा बैठका घेतल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर अजित पवार वर्ध्याच्या दौऱ्यावर असताना यावेळी पूरग्रस्त अतिवृष्टी भागाची पाहणी केली.
दरम्यान वर्ध्यातील (wardha) कान्होली गाव पूर्ण पुराच्या पाण्याखाली गेले. यात घरात पाणी शिरले. घरातील साहित्य पुरात वाहून गेले. घरातील गहू भिजून गेली. सिलेंडर वाहून गेलं. यामुळे आम्हाला गॅस सिलेंडर द्या, अशी विनवणी पूरग्रस्त महिलेनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याकडे केली. महिलेने अजित पवार (ajit pawar) यांना विनवणी केली आमचं घर बघा साहेब..., याचदरम्यान अजित पवार यांनी चक्क वाहनातून उतरून महिलेच्या घराची पाहणी केली. यावेळी महिलेचे घर पूर्णतः पाण्याखाली गेले असल्याने ओल पसरलेली पाहायला मिळाली. जी खरी परिस्थिती आहे ती स्वतः अजित पवार यांनी बघितली. महिलेला तातडीने गॅस सिलेंडर देण्यात यावी अशी सूचना देखील देण्यात आल्या आहेत.