राज्यात मागील काही दिवसांपासून विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा रणसंग्राम सुरु होता. त्यातच आज या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघातील पदवीधरांनी आणि शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीचा निकाल आता 2 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.
कुठे, किती टक्के झाले मतदान?
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी पालघर जिल्ह्यात दोन वाजेपर्यंत विक्रमी 68.41 टक्के मतदान झाले.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दुपारी दोन वाजेपर्यंत 58.27 टक्के मतदान झाले.
अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दुपारी 2 वाजेपर्यंत अमरावती विभागात 30.40 टक्के मतदान झालं.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दुपारी 2 वाजेपर्यंत 31.71 टक्के मतदान झालं.