महाराष्ट्र

गुन्हेगारांचं तोंड झाकायला ‘गार्बेज बॅग्ज’ … विरार पोलिसांचा प्रताप!

Published by : Lokshahi News

संदीप गायकवाड, प्रतिनीधी

महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी असताना विरारच्या पोलिसांनी आरोपीचा चेहरा लपवण्यासाठी चक्क प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पोलिसांनी घरफोडी आणि चोरी करणा-या तीन आरोपींना अटक करुन त्यांच्या कडून ८ गुन्हे उघडकीस आणले. तसेच साडेतेरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याची माहिती पञकारांना देताना पोलिसांनी प्रेसनोट सोबत आरोपींचा फोटो ही पत्रकारांना दिला.

माञ यावेळी आरोपींचा चेहरा दाखवयचा नसल्याने विरार पोलिसांनी आरोपीचा चेहरा चक्क कापडाने न झाकता गार्बेज बॅग म्हणजेच कचऱ्याच्या पिशवीने झाकले. हे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी