शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचा काल मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात निधन झाले. खालापूर टोलनाक्याजवळच्या भागात हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर तात्काळ नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केल्यानंतर विनायक मेटे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनतर संपूर्ण राज्यात एकच शोकाकूळ पसरला. अनेक दिग्गज लोकांनी तातडीने जेजे रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर विनायक मेटे यांचे पार्थिव बीडमधील केज तालुक्यातील राजेगाव या त्यांच्या मूळगावी घेऊन जाण्यात आले. गावातील लोक, त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांना अंत्यदर्शन घेता यावं यासाठी त्यांचं पार्थिव शिवसंग्राम भवनात आणि त्यांच्या घरात ठेवण्यात आले होते. आज दुपारी पाच वाजेच्या सुमारास राजेगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आला. शासकीय इतमामात विनायक मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाराष्ट्रातील अनेक दिग्गज राजकीय नेते मेटे यांच्या मूळगावी, अंत्यविधी अलोट गर्दी
शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्यावर आज मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यातील अनेक मोठे नेते अंत्यविधीसाठी मेटे यांच्या गावी दाखल झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते मेटे यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. मेटे यांचे अतिंम दर्शन घेण्यासाठी आलेल्या जिल्हाभरातून कार्यकर्ते व नागरिकांनी अलोट गर्दी केली.
गाव शोकाकूळ, केज जिल्हा कडकडीत बंद
शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचा काल मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात निधन झाले. त्यानंतर संपूर्ण राज्य शोकाकूळ झाले होते. आज विनायक मेटे यांच्यावर मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकूळ झालेल्या मेटे यांच्या केज जिल्ह्यात आज कडकडीत बंद असल्याचे दिसून आले.