लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान चिपी विमानतळकडे जाणारा रस्ता खड्डेमय झाला असून आठवड्यानंतर चिपी विमानतळ सुरू होत आहे. माञ खड्डेमय झालेल्या रस्त्यामुळे विरोधकांकडून खड्डेमय रस्त्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला टीकेचं लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांनी आज या रस्त्याची पाहणी करून अधिकार्यांना तत्काळ रस्ता दुरूस्त करण्याचे आदेश दिले.
तसेच या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी सहा कोटी रूपये मंजूर केले असून, चिपी विमानतळाच्या उद्घाटना पुर्वी रस्ता दुरूस्तीचे काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली आहे.