बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांकडून बदलापूर स्टेशनवर काल रेलरोको आंदोलन करण्यात आले.
याप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली, या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे. विजय वडेट्टीवार ट्विट करत म्हणाले की, बदलापूर प्रकरण दाबण्यासाठी वकील म्हणून भाजपचे उज्वल निकम यांची नियुक्ती?
बदलापूर प्रकरणी उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित, त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून नेमणूक केली, ज्याने निवडणूक लढवली. उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण? असे विजय वडेट्टीवार म्हणाले.