महाराष्ट्र

अनंत गिते पाठोपाठ आता शिवतारेंची खदखद, महाविकास आघाडीत सगळं चांगलं, पण…

Published by : Lokshahi News

अमोल धर्माधिकारी, पुणे | शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या पाठोपाठ आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली आहे. महाविकास आघाडीत नेत्यांच सगळं चांगलय, पण खाली सन्मान राखला जात नाही असे विधान केले आहे.

राज्यात आपलं सरकार आहे मुख्यमंत्री आपले आहे.न घडणार स्वप्न आपण घडवलं. पण खाली महाविकास आघाडी तील तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा मान सन्मान कोणी करायला तयार नाही.कुणी कदर करायला तयार नाही अशी खंत माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बोलून दाखवली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं त्यांचं ग्रामीण भागात संघटन मजबूत आहे. पण आपल्याला जर भगवा फडकावयाचा असेल तर कार्यकर्ते मजबूत असले पाहिजे. बारामतीत सगळे जिल्हा परिषद आमचे आहे.कार्यकर्त्यांना कशी ताकत देता येईल यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे. योग्य उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार विरोधात श्रीरंग बारणे यांना लढावं लागलं. साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि जिवाच रान करुन बारणे यांना जिंकून आणलं. मी माझं काम केलं पण त्यांनतर अनेकांनी मी निवडून कसा येत नाही यासाठी प्रयत्न केले.कडवट बोललो कि काय होतं हे मी पाहिलं आहे ते अनुभवतो आहे.यावेळी अजित पवारांवर टीका करत विजय शिवतारे यांची जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली.

अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...