महाराष्ट्र

Vidhan Parishad Election : शिवसेनेनं एकही मत काँग्रेस दिलेलं नाही?

तिसऱ्या पसंतीचे मत ठरवणार काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विधान परिषद निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. भाजप आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तर तिसऱ्या पसंतीचे मत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय ठरवणार आहे.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी महाविकास आघाडीकडून 6 तर भाजपकडून 5 उमेदवार लढत आहेत. यासाठी आज मतदान पार पडले आहे. शिवसेनेनं आपली सगळी मत आपल्याच उमेदवार दिली असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. शिवसेनेनं तिसऱ्या क्रमकांच्या पसंतीचे मत भाई जगताप यांना दिले आहे.

तर, राष्ट्रवादीने देखील आपली पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची मते आपल्या उमेदवारांना दिली आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचे मत काँग्रेसच्या भाई जगताप यांना दिले आहे. व चौथ्या पसंतीची मते चंद्रकांत हांडोरे यांना दिली आहेत. त्यामुळे तिसऱ्या पसंतीच्या मतांवर काँग्रेसचा दुसरा उमेदवार भाई जगताप निवडणूक येणार का हे ठरणार आहे.

Raj Thackeray MNS Manifesto; 'आम्ही हे करु' नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यात काय?

'आम्ही हे करु' नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

मतदानाच्या दिवशी पुणे महानगरपालिकेला सुट्टी

अभिनेता शाहरुख खान धमकीप्रकरणी आरोपीला 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

“कोमट" पाण्यातील गॅरंटीच्या "चकल्या"!! आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा