विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होणार असून संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतमोजणी होणार आहे. क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून विशेष खबरदारी घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
विधान परिषदेत महायुती की महाविकास आघाडी कोणाला पराभव स्विकारावा लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. हरणारा 12वा उमेदवार कोण असणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
विधानसभेचं संख्याबळ सध्या 274 इतकं आहे. तर उमेदवारांना विजयाकरता पहिल्या पसंतीच्या म्हणजेच 2284 म्हणजे 23 मतांची आवश्यकता आहे.