महाराष्ट्र

दहावीची परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम… शालेय शिक्षण मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Published by : Lokshahi News

दहावीची परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार अद्याप ठाम असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. दहावीच्या परीक्षांचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. दुसऱ्या लाटेमध्ये अनेक जण पॉझिटिव्ह आले आहेत. १७ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.

सध्या मुलांची मानसिकता खचली आहे. कोरोनाची असाधारण परिस्थितीमुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत, असे त्या म्हणाल्या. मात्र न्यायप्रविष्ट बाब असल्याने हे प्रकरण अद्याप खोळंबले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...