महाराष्ट्र

वालधुनी नदी पुन्हा एकदा होणार रसायनमुक्त;सीईटीपी प्रकल्प सुरू

Published by : Lokshahi News

मयुरेश जाधव | अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत असलेला रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अखेर ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे आता एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांचं सांडपाणी प्रक्रिया करून थेट कल्याणच्या खाडीत जाणार आहे. त्यामुळे वालधुनी नदी रसायनमुक्त होणार आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी अशी ओळख असलेल्या अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत एकूण १२०० पेक्षाही जास्त कंपन्या आहेत. त्यापैकी १२७ बड्या रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये मिळून दररोज जवळपास ४ एमएलडी रासायनिक सांडपाणी तयार होतं. मात्र या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एमआयडीसीत प्रक्रिया केंद्रच नसल्यानं ते जुजबी प्रक्रिया करून वालधुनी नदीत सोडलं जात होतं. त्यामुळे वालधुनी नदीचा अक्षरशः रासायनिक नाला झाला होता.

दरम्यान आता एका खासगी संस्थेकडून हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आलं असून तिथे दररोज ७.५ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अंबरनाथ एमआयडीसीत सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद असल्यामुळे अस्तित्वातील कंपन्या आपला विस्तार करू शकत नव्हत्या. तर नव्याने येत असलेल्या २० ते २५ कंपन्यांनाही परवानगी मिळत नव्हती. मात्र आता या नव्या कंपन्या सुद्धा अंबरनाथमध्ये येऊ शकणार असून त्यामुळे उद्योग, रोजगार, निर्यात या सगळ्यात वाढ होणार आहे.

अंबरनाथ एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमधून सध्या वार्षिक ६ ते ८ हजार कोटींची उलाढाल होते, मात्र हाच आकडा आता २० हजार कोटींवर जाईल, असा विश्वास यानंतर ऍडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली आहे.

सुहास कांदे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला

Harshvardhan Patil : मला विश्वास आहे, महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल

Sada Sarvankar CM Shinde Meet:सरवणकरांना मुख्यमंत्र्यांचा अल्टिमेटम, शिंदेंसोबतच्या चर्चेत काय ठरलं?

Shaina NC : उबाठा मला माल बोलता... "तुम्ही बेहाल होणार .."| Mumba Devi VidhanSabha

Deepak Kesarkar Sawantwadi Assembly Constituency : दीपक केसरकर चौथ्यांदा गड राखणार?