महाराष्ट्र

उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणात बीड कनेक्शन; तीन जण युपी पोलिसांच्या ताब्यात

Published by : Lokshahi News

उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणी एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, धर्मांतरासाठी परदेशातून निधी मिळत आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. धर्मांतर प्रकरणात तीन धर्मगुरूंची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून आले. एटीएस आता तिन्ही धार्मिक गुरूंची चौकशी करून धर्मांतर प्रकरणाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रशांत कुमार यांनी सांगितलं की, या आरोपींच्या कॅनडा आणि कतार कनेक्शनची चौकशी सुरू आहे.

दिल्लीमधून याप्रकरणी तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यापैकी इरफान शेख हा मूळचा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे. इतर दोन आरोपींपैकी एक राहुल भोला हा दिल्लीतील उत्तम नगर येथील शिश्राम पार्कचा रहिवासी आहे, तर मन्नू यादव हरियाणाच्या गुडगाव जिल्ह्यातील बापूरचा रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. तर, मन्नू यादवने मुलांचे धर्मपरिवर्तन केले होते, असं म्हटलं जातंय.

मुळचा बीडचा असलेला इरफान हा दिल्लीच्या मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेलफेयरमध्ये इंटरप्रेटर म्हणून काम करतो. तो मूक-बधीर लोकांना इस्लाम शिकवतो. इरफाननेच मूक-बधिराला आमिष दाखवून धर्म परिवर्तन केले. दुसरा युवक राहुल भोला हा स्वतः मूक बधिर आहे. तो या कामात इरफानची मदत करत होता. इरफानबाबत बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रदीप एकशिंगे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, सिरसाळा पोलीस ठाण्याला या प्रकरणाबाबत कुठलीच लेखी माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र दिल्ली पोलिसांनी सिरसाळा गावच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी