उत्तर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी मुंबईत कार्यालय (Uttar Pradeshs Mumbai office) सुरु करण्याच्या निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी घेतला आहे. या कार्यालयाचा उद्देश मुंबईत राहणाऱ्या यूपीच्या रहिवाशांना ( UP residents living in Mumbai ) त्यांच्या राज्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे, त्यांच्या हितांचे रक्षण करणे आणि त्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणे हा असणार आहे.
याबाबत कॉंग्रसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. सावंत म्हणाले की, युपी सरकारने मुंबईत कार्यालय सुरू करण्याचा निर्णय हा मुंबई मनपा निवडणुकीसाठी घेण्यात आला आहे. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी योगी सरकारच्या या निर्णयावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरेंबद्दल उत्तर भारतीयांची काय भावना आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं
लखनौ - उत्तर भारतीय आणि मराठी माणूस हा वाद निर्माण होत असल्याने उत्तर भारतीयांच्या सुरक्षेचा ( safety of North Indians in Mumbai ) प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उत्तर प्रदेशातील रहिवाशांसाठी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला ( Yogi Adityanath Mumbai office ) आहे.