कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये अडीच हजार 'सपा' कार्यकर्त्यांविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी लखनऊमध्ये समाजवादी पार्टीच्या व्हर्च्युअल रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, त्यामुळेच हा एफआयआर नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपा नेते स्वामी प्रसाद मौर्य, धरम सिंह सैनी यांच्यासह अनेक नेत्यांनी सपामध्ये प्रवेश केला. या प्रसंगी आयोजित एका कार्यक्रमात अखिलेश यादव यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. या प्रसंगी 'व्हर्च्युअल रॅली'मध्ये सहभागी होण्यासाठी शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला.
निवडणूक आयोगाने १५ जानेवारीपर्यंत पाच निवडणूक राज्यांमध्ये सार्वजनिक रॅली, रोड शो आणि सभांवर बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचे आदेशही दिले आहेत.