महाराष्ट्र

माथेफिरूचा उच्छाद;शेतातील 2 एकर कपाशी पीक टाकले उपटून

Published by : Lokshahi News

मंगेश जोशी । जळगाव जिल्ह्यात एका माथेफिरूने चक्क शेतातील 2 एकर कपाशी पीक उपटून टाकल्याची घटना घडली आहे. एका महिलेच्या शेतात शिरूर त्याने हा प्रकार केला. दरम्यान आपल्या शेतीची झालेली हि नासधूस पाहून शेतकरी महिलेचा टाहोच फोडत आक्रोश केला. दरम्यान आता या माथेफिरूवर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात अज्ञात माथेफेरूने दीड ते दोन एकर जमिनीतील कपाशी उपटून महिला शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान केले आहे. महिला शेतकरी मीराबाई उत्तम गायकवाड यांचे शेत होते. आर्थिकसह शारीरिक संकटांचा सामना करत दिवस रात्र मेहनत करून शेतात लावलेले कपाशीचे पीक अज्ञातांनी उपटून टाकल्याने मीरा बाई गायकवाड यांनी टाहो फोडात आक्रोश केला. दरम्यान ग्रामस्थांनी महिला शेतकरी मीराबाई यांचे सांत्वन केले. तसेच पिकांचे नुकसान करणाऱ्या अज्ञात माथेफिरूचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी