महाराष्ट्र

साताऱ्यात अवकाळी पाऊस; वीज कोसळून 3 जणांचा मृत्यू

Published by : Lokshahi News

रविवारी राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. साताऱ्यात झालेल्या मुसळधार पावसात खंडाळा आणि माण तालुक्यात वीज पडून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन ठिकाणी वीज पडन मंदिर आणि घराचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात रविवारी संध्याकाळच्या सुमारास सातारा शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी झालेल्या पावसामुळे लोकांची एकच त्रेधातिरपट उडाली. खंडाळा आणि माण तालुक्यात एका महिलेसह तीन जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.

तर सातारा शहरातील प्रतापगंजपेठेत एका घराच्या टेरेसवर वीज कोसळली. वीज कोसळल्यामुळे भिंतीला भलेमोठे भगदाड पडले आहे. तर कळंबे गावातील मंदिराच्या शिखरावर वीज पडल्यामुळे मंदिराचे नुकसान झाले आहे.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...