पन्हाळगडा शेजारी असणाऱ्या पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवण्यात आला आहे. बिहार आणि पश्चिम बंगालमधील 45 विद्यार्थी या मदरशामध्ये शिकत होते. हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई करण्यात आली आहे.
पावनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या मदरशातील मुलांना रात्रीत शिरोली मधील मदरसामध्ये हलवण्यात आलं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पावनगडावर ही मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली आहे. पावनगडावरील अनाधिकृत मदरसा 1989 पासून होता .
हिंदूत्ववादी संघटनेकडून मदरसा हटवण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेच्या तक्रारीनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.