शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरांचे नेतृत्व एकनाथ शिंदे हे करित आहेत. एकूण ४० पेक्षा अधिक आमदार आपल्याबरोबर असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे सरकार पडणार की जाणार ? यावरुन राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नाराज नेते आणि राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. या संवादामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना भावनिक साद घातली.
माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं? गुजरातला जाऊन बोलायची काय गरज आहे. मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन सांगावे, मी पद सोडायला तयार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचं फेसबूक लाईव्ह पाहून आता मोठी घडामोड समोर येत आहे. उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर राहायला जाणार आहेत.