सांगली, कोल्हापूर, कोकण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचं थैमान पहायला मिळालं. अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झालेली पहायला मिळाली. तळीये सारख्या रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावामध्ये मोठा हाहाकार झालेला पहायला मिळाला. दुसरीकडे अजूनही पूरातून सांगली, कोल्हापूर जिल्हा सावरलेला दिसून येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीचा दौरा करणार आहेत.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना २०१९च्या महापुराचा इतिहास आहे. यंदाही अतिवृष्टीमुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली, आणि याचं रुपांतर पुरात झालं. सांगली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरं रिकामी करावी लागली. अनेक नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं. आता पूर ओसरल्यानंतर मुख्यमंत्री या ठिकाणी पाहाणी करण्यासाठी जाणार आहेत.