सचिन बडे| औरंगाबाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांची उद्या बुधवारी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या आधी सुरक्षा यंत्रणांकडून सर्व तपासण्या करण्यात येत आहे. श्वानपथक आणि बॉम्बशोधक पथकांकडून बारकाईनं तपासणी केली गेली. सभेचे व्यासपीठ आणि व्यासपीठाला जवळील मोकळ्या जागेवर सुरक्षा यंत्रणेचे बारीक लक्ष आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांच्या सभेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक सक्रिय आहेत.
काय असणार व्यवस्था
■ औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तसेच जळगाव जिल्ह्यातून सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी हर्सुल सावंगी बायपास मार्गे केंब्रिज चौक, झाल्टा फाटा, बीड नाका, देवळाली चौक, गोदावरी चौक, एम आय टी कॉलेज महानुभाव चौक, रेल्वे स्टेशन कडून आपली वाहने कर्णपुरा पार्किंग व आयोध्या नगरी पार्किंग याठिकाणी पार्किंग करावी
■ जालना तसेच लगतच्या बुलडाणा जिल्ह्यातील सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी केंब्रिज नाका, झाल्ता फाटा, बीड नाका, देवळाली चौक,एम आय टी, महानुभाव चौक, रेल्वे स्टेशन या मार्गाने येऊन अयोध्या नगरी व कर्णपुरा या ठिकाणी आपली वाहने पार्किंग करावीत
■ नवीन धुळे सोलापूर हायवे वरून अंबड, बीड कडून सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी त्यांची वाहने कांचनवाडी येथुन महानुभाव आश्रम, रेल्वे स्टेशन येथून आपली वाहने अयोध्या नगरी व कर्णपुरा पार्किंग येथे पार्क करावीत
■ कन्नड व वैजापूर या तालुक्यातुन सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने, AS क्लब, नगर नाका, लोखंडी पूल या मार्गे येऊन कर्णपुरा पार्किंग या ठिकाणी पार्किंग करावीत
■ बाहेरुन जिल्ह्यातून सभेसाठी येणाऱ्या वाहनांनी शक्यतो पक्षातर्फे दिलेले स्टिकर व झेंडे गाडीवर समोरील दर्शनी भागात लावून यावे,
■ बाहेर जिल्ह्यातून येणारी वाहने यांनी आपली वाहने व्यवस्थित कर्णपुरा व अयोध्या नगरी येथे पार्किंग करावीत
■ आपल्या वाहनामुळे इतर वाहनांना पार्किंग करण्यास व पार्किंग मधून गाडी घेऊन जाण्यास अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी
■ कुठेही रस्त्यावर अस्ताव्यस्त गाड्या पार्क करू नये
■ पोलिसांनी दाखवलेल्या रस्त्यानेच वाहने घेऊन पार्किंग कडे यावीत, विनाकारण त्यांच्याशी हुज्जत घालू नये
■ पार्किंग ची माहिती होण्यासाठी विविध पॉइंटवर नेमलेल्या पोलीस अंमलदार यांची मदत घेणे, वाहने पार्किंग केल्यानंतर ती व्यवस्थित लॉक करावीत शक्य असल्यास ड्रायव्हर वाहना जवळ ठेवावेत
■ सभेकरिता येणाऱ्या नागरिकांनी सभा संपल्यावर व सभेसाठी जाताना आक्षेपार्ह घोषणाबाजी करणे किंवा नागरिकांशी हुज्जत घालू नये असे प्रकार करू नये.
■ कोणीही पदाधिकारी, कार्यकर्ता पोलिसांच्या कोणत्याही सूचनेकडे दुर्लक्ष करणार नाही, त्या सूचनांचे उल्लंघन करणार नाही
■ बाहेरगावच्या कार्यकर्त्यांनी सभेसाठी येताना व जाताना ज्या ठिकाणी कोणत्याही हॉटेल वर आपण चहा-नाश्ता जेवणासाठी थांबल्यास, आपली व पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये या दृष्टीने काटेकोर वर्तन ठेवावे...
■सभेच्या दरम्यान कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी करू नये.
■ सभेच्या ठिकानी कोणतीही सूचना असल्यास जवळच्या पोलिसांकडे व्यक्त करावी.
■ सभेच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी रांगेचे पालन करावे.
■ सभेला येणाऱ्या महिलांचा योग्य तो आदर करावा..
■ सभा संपल्यानंतर महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अगोदर जाऊ द्यावे. त्यानंतरच पुरुषांनी निघायचे आहे म्हणजे वाहतूक व्यवस्था अत्यंत सुरळीत राहील,
■ या शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुनियोजित ठेवण्यासाठी पोलिस विभाग अत्यंत खडतर परिश्रम घेत आहे.. आपल्या कोणत्याही निष्काळजीपणामुळे किंवा चुकीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये याची दक्षता घ्यावी...
■ सभेसाठी येताना जाताना वाहनांच्या मागे जर एखादी अॅम्बुलन्स रुग्णवाहिका आल्यास तिला सर्वप्रथम रस्ता मोकळा करून द्यावा. या सोबत वाहतूक नियोजन, पार्किंग याचा नकाशा जोडला आहे त्यानुसार पालन करावे.