नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पक्ष प्रमुख असलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज शिवसेना भवनात पोहचले. यावेळी शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधत भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर टीका केली. तसेच मुंबईच्या पर्यावरणासाठी महत्वाचा असलेले आर कारशेडचा निर्णय रद्द करु नका, अशी विनंती केली.
नवनिर्मित सरकारचे अभिनंदन करतांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, आज पहिल्यांदा माझा चेहरा पाडला आहे. मला दु:ख झाले आहे. शिवसैनिकांचे आश्रू माझ्यासाठी मोठी ताकद आहे. ती ताकद अशीच राहू द्या.
अडीच वर्षापूर्वी मी अमित शहा यांना अडीच वर्षाचा फॉर्मुला सांगितला होता. पण त्यावेळा त्यांना ते पटलं नाही. अडीच वर्षापूर्वी जे ठरल होत आता तेच झाल. मग त्यावेळी त्यांनी का ऐकलं नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. तथाकथिक शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असे नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हे आहेत चार महत्वाचे मुद्दे
१)राज्यात नवीन सरकारने शिवसैनिकास मुख्यमंत्री केले. अडीच वर्षांपुर्वी मी हेच सांगितले होते. तेव्हा अमित शहा आणि माझ्यात हीच चर्चा झाली होती. ते पाळले गेले असते तर आज ही परिस्थिती नसती. भाजपला अडीच वर्ष मुख्यमंत्री मिळाला असता आणि मविआ झाली नसती.
२)शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री असू शकत नाही. त्यामुळे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, असे सांगत एकनाथ शिंदे आता शिवसैनिक नाही, हे त्यांनी स्पष्ट करत शिवसेनेवर आपलीच पकड असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
३) नवीन सरकारच्या पहिल्याच बैठकीत आरे कारशेडचा माझा निर्णय बदलला. मुंबईकरांचे वतीने सांगतो, आरे कारशेडचा आग्रह लेटून नेऊ नका. मुंबईच्या पर्यावरणास धोका करु नका, अशी विनंती करत उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या हिताचा निर्णय घेण्याचा सल्ला दिला.
४) लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. आता या चारही स्तंभांनी लोकशाही वाचवण्यासाठी पुढे आले पाहिजे. ७५ वर्षांत लोकशाही धिंडवडे निघाले आहेत. हे देशाच्या दृष्टीने घातक आहे.