मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यभरात वाढत असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज ४.३० वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. यानंतर लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यात दिवसा जमावबंदीची घोषणा केली आहे. तसेच सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत कडक संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. या मिनी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा सुरळीत असणार आहे.
मुंबईतही लॉकडाऊन लावण्याचे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लॉकडाऊनबाबत मानसिक तयारी करण्याचे आवाहन केले होते.