महाराष्ट्र

कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी दखल घ्यावी : उद्धव ठाकरे

Published by : Lokshahi News

"राज्यात कुणाचेही सरकार असो पण दैवते बदलत नाहीत. हा कानडी अत्याचार बंद करण्यासाठी आता पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तेथील राज्य सरकारला आदेश द्यावेत व या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यास सांगावे," अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

"बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका. गेले कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या आपल्या आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी असल्याचे मतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

"छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत, तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे," अशा तीव्र शब्दांत ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Vasai: वसईत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे बेमुदत आंदोलन

मुस्लिम आंदोलकांनी द्वेषपूर्ण भाषणासाठी भाजप आमदार आणि धर्मोपदेशकावर कारवाईची मागणी करत मुंबईकडे काढला मोर्चा

Oval Maidan: ओव्हल मैदान, इतर क्रीडा स्थळांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारा, महाराष्ट्र लोकायुक्तांचे सरकारचे आदेश

Mumbai Metro-3 | पहिली भूमिगत मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत;पहिल्या टप्प्याचं लवकरच लोकार्पण

Navratri 2024: "या" कारणामुळे नवरात्री 9 दिवस साजरी केली जाते, जाणून घ्या...