महाराष्ट्र

Uddhav Thackeray : 'हे मोदींसमोर वळवळणारे म्हांडूळ' उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Published by : shweta walge

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा 'भगवा सप्ताह मेळावा' पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, घोषणा देऊन निवडणुका जिंकता येत नाही. मिंदे सरकारकडून घोषणांचा पाऊस पण राज्यात दुष्काळ पडला आहे. मतदार नोंदणी केली नाही तर दोन महिने थांबा. चांडाळ कलेक्टरला गज मोजायला लावल्याशिवाय राहणार नाही. मोदीसमोर वळवळनार मांडूल आहे. दिल्ली समोर मांडूलच पँट घान करतात.

ते म्हणाले, योजनामध्ये 15 लाख देणार होते 1500 रुपये झाले. कंत्राटीदारवर प्रेम जास्त आहे. ठरलेल्या कंत्राटीदार काम देतात. पण दुसऱ्याला काही दिले जात नाही. संपूर्ण राज्यात खड्डे खड्डेच आहे आणि आमच्याकडे बोट दाखवितात. 3 महिने वाट पहा काय करतो पहाच. राज्याचा मंत्रालय मुंबईत हवा की अहमदाबाद हवा विधानसभाची लढाई महाराष्ट्र द्वेष करणाऱ्यासोबत आहे.

‘दुबार मतदान नोंदणीचा मुद्दा चांगला आहे. कलेक्टरने सांगू काही केलं नाही. तीन महिने थांबा. सरकारी कलेक्टर आणि मिंध्याचे कलेक्टर कुठे पाठवतो ते बघा. चांडाळ चौकडी आहे. त्यांना तुरुंगाचे गज मोजायला लावूया. ही काही गंमत नाही. हे ठाणं उभं राहिलं त्यामागे शिवसेनाप्रमुखांचं प्रेम, शिवसैनिकांची अपार मेहनत. ही मेहनत झाली नसती तर मिंधेंची दाढी उगवली झाली नसती.’

‘नमक हराम टूची उत्सुकता आहे. नागांचा मी अपमान करू शकत नाही. हे मांडूळ आहेत. गांढूळ नाही. हे दुतोंडी आहे. यांना फणा नाही. हे मोदींसमोर वळवळ करणारे मांढूळ आहे. हे लोटांगण घालतात. पँट तिकडे जाऊन खराब होत नाही. फोन आल्यावरच खराब होते. जसे असाल तसे या. फोन येताच पळतात. नशिब पँट घातलेली असते.’

मी ठाणेकरांचे कौतुक करण्यास करण्यास आलो आहे. सर्वकाही पळवलं तरी सव्वापाच लाख पाठीशी उभे राहिले. कल्याणमध्ये मिधेंचे कार्टे उभे होते, आमच्या शिवसैनिकाचा पराभव करण्यासाठी विश्वगुरुंना बोलवावे लागले. मुंबईमध्ये कीर्तिकरांची सीट 48 मतांनी गेली ही चोरलेली सीट आहे. पदवीधरमध्ये शिवसैनिक निवडून दिला. कोकण माझंच आहे. हे सगळे चाळे अब्दालीचे चाळे आहे. मी का अब्दली का बोललो? रागाने नाही बोललो. अहमदशाह अहमदाबाद शाह नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब महाराष्ट्रवार चालून आला. औरंगजेबाच्या घोड्यांना पाणी पिताना संताजी धनाजी दिसायचे. तसे अब्दालीच्या खेचऱ्यांना पाण्यात उद्धव ठाकरे दिसतोय. तु्म्हाला महाराष्ट्राचं पाणी काय आहे हे शिवसेना दाखवून देईल. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसैनिकांकडून ठाकरेंच्या कारवर हल्ला करण्यात आलाय. काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर मनसेने आता थेट उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकले आहे. उद्धव ठाकरेंचा ताफा जात असताना मनसैनिकांनी त्यांच्या गाडीवर शेण फेकले आहे. शिवाय, ठाकरेंच्या ताफ्यावर बांगड्या आणि टोमॅटो फेकण्यात आले आहेत.

वायू प्रदूषण आणि उष्णतेमुळे ब्रेन स्ट्रोकची प्रकरणे वाढली; जगात अशा लोकांची संख्या पोहोचली 1.19 कोटींवर

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर