महाराष्ट्र

“आरोपींना कडक शिक्षा होणार, तुम्ही तुमची काळजी घ्या ”

Published by : Lokshahi News

काही दिवसांपूर्वी कल्पिता पिंपळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये त्यांच्या हाताची दोन बोटे तुटली गेली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरें कल्पिता पिंपळे यांच्याशी संवाद साधला. पिंपळे या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असताना त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. पिंपळे सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. पिंपळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कल्पिता यांच्या धाडसाचं कौतुक करतानाच त्यांना एक आश्वासन दिलं.

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कल्पिता पिंगळे यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून दिला. कल्पिता यांनी फोन घेताच मुख्यमंत्र्यांनी, "तुमचं कोणत्या शब्दांत कौतुक करावं. मी तुम्हाला शब्द देतो की…तुम्ही बरे झाल्यानंतर कारवाई करणार म्हणत आहात, पण आता ती जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. तुम्ही चिंता करु नका. लवकर बरे व्हा," असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपण या हल्ल्यानंतर भेट घेण्यासाठी का आलो नाही यासंदर्भातही कल्पिता यांना माहिती दिली. "मला रोज रिपोर्ट येत असतो. उगाच त्यात राजकारण नको म्हणून फोन करणं, भेटणं टाळलं. आरोपींना कडक शिक्षा होणार. त्याची काळजी तुम्ही करु नका," असं मुख्यमंत्र्यांनी कल्पिता यांना सांगितलं.

काय घडलं नक्की त्या दिवशी ?
गेल्याकाही दिवसांपासून ठाणे महापालिकेने रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत सोमवारी (३० ऑगस्ट २०२१ रोजी) कारवाई सुरू होती. सायंकाळी ६.३० च्या सुमारास पिंपळे यांच्या पथकाने कासारवडवली येथील बाजारपेठेत भाजीविक्रेता अमरजीत यादव याची गाडी जप्त केली. त्यामुळे अमजीत याने पिंपळे यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यावर सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला वाचविण्यासाठी पिंपळे यांनी सुरा पकडला. मात्र, त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली. पिंपळे यांच्या बचावासाठी गेलेल्या त्यांच्या अंगरक्षकावरही अमरजीतने हल्ला केला. यात त्याच्याही डाव्या हाताची दोन बोट कापली गेली.

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर यंत्रणा सतर्क, शरद पवारांना Z+ सुरक्षा देण्याचा निर्णय?

Shivsena UBT Candidate List | ठाकरेंच्या शिवसेनेची संभाव्य यादी समोर, पाहा कुणाला मिळू शकते उमेदवारी

VidhanSabha Elections UBT: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले! छत्रपती संभाजी नगरसाठी "या" उमेदवारांची नावे आली समोर...

VidhanSabha Elections UBT: ठाकरे गटाकडून अजित पवारांना मोठा धक्का!ठाकरे गटात इनकमिंगला सुरुवात

Satish Chavan: आमदार सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीमधून 6 वर्षासाठी निलंबन